ShivSena Case : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे.
ShivSena Case : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत. (Maharashtra politcal crisis Supreme Court final decision shiv sen mla desqualification case)

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय देताना उद्धव ठाकरेंना दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटलं की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला म्हणून ही स्थिती पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे.

ShivSena Case : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Jayant Patil ED Notice: लग्नाच्या वाढदिवशीच जयंत पाटलांना मिळाली ईडीची नोटीस; म्हणाले...

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडं सोपवला आहे. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच याबाबत निर्णय घेणार आहेत. पण हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com