migrants 
मुंबई

कोकणवासीयांची पायपीट सुरुच; गावाकडे परतणाऱ्यांचा जीवघेणा प्रवास

सकाळवृत्तसेवा

तळा (बातमीदार) : एरव्ही गाड्यांची वर्दळ असणाऱ्या मार्गावर आता मोजकीच वाहने तर जीवावर बेतून पायपीट करणारे मजूर जाताना दिसत आहेत. मुंबई येथून कोकणात पायी जात घर गाठण्यासाठी संघर्ष ते करत आहेत. परप्रांतियांना गावी पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे; मात्र कोकणवासीयांची पायपीट आजही सुरुच आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरुन अजुनही लोक शेकडो किलोमिटर पायपीट करीत असून एकही लोकप्रतिनीधी याकडे गंभीरपणे पाहात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  नागरिक आपापल्या परीने यथाशक्ती अन्नदान तसेच या तहानलेल्या, भुकेलेल्या, गावच्या ओढीने डोळ्यात आसवं, व्याकूळ झालेल्या, थकल्या भागल्या जीवांची तहान भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

संचारबंदीचे कठोर नियम पाळत हे पुण्यकर्म ही माणस करीत आहेत. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, प्रांत, तहसिलदार, पोलीस यंत्रणेप्रमाणेच या प्रसंगी मदत करणाऱ्या नागरिकांची भावना लक्षात घेऊन या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घ्यावे. उलट ही पायपीट थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनीधी यांनी  तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

अन्नदान, पाणी देणे हे कर्तव्य तर करुच पण या लोकांना त्यांच्या ईप्सीतस्थळी पोहचविणे ही देखील आपली जबाबदारी आहे. सध्या कोकणवासी रक्ताच पाणी करीत, कोरोनाचे भयंकर मानसिक वादळ झेलत, तणावग्रस्त अवस्थेत घरच्या माणसांच्या, गावच्या ओढीने, मनात जीवन जगण्याची शेवटची आशा घेऊन निघाले आहेत. कोकणवासीयांच्या यातना थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT