शरद पवारांनी BKC मध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

मुख्यमंत्री ठाकरेंनी केली गोरेगावची पाहणी, शरद पवार यांची एमएमआरडीए रुग्णालयाला भेट 

मुंबई : कोरोना स्थितीच्या हाताळणीचा आढावा घेण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील संकुलात सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाची पाहणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात आलेल्या रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मोठी बातमी - कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

मुंबईतील रुग्णसंख्या वाढणार असे गृहित धरून सुमारे 20 हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी धारावी आणि कुर्ला परिसरात जेथे कोरोना विषाणूचे वाहक आहेत तेथेच रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात 27 कोटी रुपये खर्चून सुमारे 500 खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. तेथे प्राणवायूसह अन्य सुविधा मिळतील याची पाहणी करण्यात आली. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही व्यवस्थेचे अवलोकन केले.

मुंबईकरांनो पुढच्या महिन्यापासून 'या' युद्धासाठीही तयार राहा, 'हे' आहेत हॉटस्पॉस्ट..

गोरेगावात नेस्को मैदानात 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले आहे. परिसरातील रुग्णांना तिथे औषधोपचार दिले जाणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पाहणीच्या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापालिका उपायुक्‍त संजीव जयस्वाल, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

sharad pawar visits bkc corona quarantine facility read full news 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar visits bkc corona quarantine facility read full news