Palghar elections
Palghar elections 
मुंबई

पालघर जिल्हयात दिग्गजांच्या प्रचार तोफा धडाडणार

भगवान खैरनार

मोखाडा : पालघर जिल्हयात जव्हार, डहाणू या नगरपरिषदांसह वाडा नगरपंचायतीची निवडणूक 13 डिसेंबरला होत आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनिती आखत स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, भाई जगताप, शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील तर भाजप कडुन विनोद तावडे, विष्णू सावरा आणि चिंतामण वनगा यांच्या सभा निश्चित केल्या जाणार असल्याची माहिती पक्षीय प्रतिनिधींनी दिली आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून, पालघर जिल्हयातील जव्हार, डहाणू या नगरपरिषदांसह वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे राजकीय पक्षांकडून पाहिले जाते आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी कमी अवधी मिळाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवरच भर दिला आहे. मात्र, पक्षाचे ध्येय धोरणे, निवडणुकीतील वातावरणात बदल करण्यासाठी पक्षातील दिग्गज स्टार प्रचारकांच्या सभा घेणे आवश्यक असते. त्यादृष्टीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने आपल्या पक्षातील जेष्ठ दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, हिवाळी अधिवेशन 10 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने, नेत्यांच्या सभांच्या तारखांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सभांचे आयोजन केल्याची माहिती पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी दिली. राष्ट्रीय काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप यांच्या सभांचे आयोजन केले असल्याचे काँग्रेसचे पालघर जिल्हा सरचिटणीस संदिप मुकणे यांनी सांगितले आहे. तर शिवसेना नेते औद्योगिक मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभा घेण्याचे आयोजन केले असल्याचे जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी सांगितले आहे. तसेच भाजपने शिक्षणमंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा आणि खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या सभा घेण्याची तयारी केली असल्याची माहिती भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र भोये यांनी दिली. 

दरम्यान, कमी कालावधी आणि हिवाळी अधिवेशनामुळे 8 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान स्टार प्रचारकांच्या सभा होतील, असा अंदाज सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. या सभांमुळे या निवडणुकांमधील वातावरण बदलणार असल्याचा विश्वास सर्वच, राजकीय पक्षांच्या नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT