मुंबई

बीफ खुशाल खा; महोत्सव कशाला? 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सरकारच्या गोमांस बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बीफ महोत्सव भरवणाऱ्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी फटकारले. "तुम्हाला बीफ खायचे आहे तर जरूर खा; पण त्यासाठी बीफ महोत्सव भरवण्याची गरज काय,' असा सवाल करीत उपराष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. 

माटुंगा येथील एस. पी. मंडळी शिक्षण संस्थेच्या आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे उद्‌घाटन सोमवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्या वेळी नायडू बोलत होते. भाषणाची सुरवात मराठीत करून उपराष्ट्रपतींनी उपस्थितांची मने जिंकली. ""आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थांची चव चाखणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग चढवण्याची गरज नाही. त्यामुळे बीफ महोत्सव भरवण्याची गरज काय? उद्या कोणाचे चुंबन घ्यायचे असेल, तर त्यासाठी काय "किस महोत्सव' भरवणार का,'' असा सवालही त्यांनी केला. 

या वेळी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचा मौलिक सल्ला नायडू यांनी दिला. आपली मातृभाषा आपले डोळे आहेत. इतर भाषा डोळ्यांवरचा चष्मा आहे, असा सल्ला देत प्रत्येक राज्यांनी शाळांमध्ये मातृभाषा बंधनकारक करायला हवी, असेही ते म्हणाले. या प्रसंगी गृहमंत्री प्रकाश मेहता, एस. पी. मंडळीचे सोहनलाल जैन, आमदार माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. 

आज जगभरात दहशतवाद हे मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. अशातच ज्या व्यक्तीने देशाची संसद उडवून देण्याचा कट रचला, त्याचा जयजयकार कशाला होतो? 
- व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT