Crime
Crime 
मुंबई

गुंडाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

नालासोपारा - नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क येथील स्थानिक गुंडाच्या त्रासाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. महिलेची प्रकृती चिंताजनक असून, वसई-विरार पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली असून, स्वत:ची ध्वनिचित्रफीतही बनविली आहे.

मुकेश गुप्ताच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पीडितेने म्हटले आहे. तुळिंज पोलिसांनी याबाबत तक्रार घेऊन गुंडांवर कारवाई न केल्याने माझ्या पत्नीला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागल्याचा आरोप पती सुरेश राठोर यांनी केला आहे. फाल्गुनी राठोर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क येथे त्या कुटुंबीयांसोबत राहतात. तेथेच मुकेश गुप्ता याचे सर्व्हिस सेंटर आहे. दीड महिन्यांपासून गुप्ता त्रास देत असल्यामुळे पीडिता दबावाखाली होती. २६ फेब्रुवारीला याच गुंडाने पीडित महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली होती. शुक्रवारी पुन्हा गुप्ताने पतीला मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. चौकशीनंतर कारवाई करणार असल्याचे तुळिंज पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT