mumbai mayor
mumbai mayor 
मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली सायन रुग्णालयाला भेट; चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती 

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेेय घोले यांनी सायन रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डला शुक्रवारी भेट दिली. महापौरांनी (पीपीई किट )परिधान करून थेट कोरोना बांधितांवर उपचार सुरू असणाऱ्या कक्षात जाऊन पाहणी केली. तसेच, प्रत्यक्ष कोरोनाबाधितापर्यंत जाऊन वैयक्तिकरीत्या संवाद साधला. 

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, पालिकेतर्फे याठिकाणी देण्यात आलेल्या सोयीसुविधेबद्दल आपण समाधानी आहात का? अशी विचारणा केली असता सर्व जणांनी समाधानी आहेत असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे डॉक्टर, परिचारिका आपली नीट काळजी घेत आहे ना ? अशी विचारणा महापौरांनी यावेळी रुग्णांना केली असता त्यांनी काळजी घेत असल्याचे महापौरांना सांगितले. 

प्लाझ्मा दान करण्याचेही आवाहन - 

जोपर्यंत आपला रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत याठिकाणी आपल्याला उपचार घ्यावे लागणार असल्याचे महापौरांनी रुग्णांना बजावून ही सांगितले. तसेच, आपण बरे झाल्यानंतर प्लाझ्मासाठी आपले रक्त हवे असल्यास आपण आपले रक्त देण्याची तयारी ठेवावी असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. जेणेकरून आपल्या रक्तामुळे तीन जणांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लवकर बरे होऊन इतरांची सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले. डॉक्टर, नर्सेस खूप चांगले काम करत असून या ठिकाणी मिळत असलेल्या वागणुकीबद्दल समाधानी आहात ना ? अशी विचारणा महापौरांनी केल्यानंतर सर्वांनी होय असे उत्तर दिले.

महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच रुग्णालय कर्मचाऱ्यांची सुद्धा बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे यावेळी केली. याबाबत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महापौरांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

त्यासोबतच रेल्वेच्या जलद थांब्यांवरून महापालिका रुग्णालयांपर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी युनियनचे पदाधिकारी यांनी केली. याबाबतही महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

कोरोना कक्षाला भेट दिल्यानंतर महापौरांनी कार्यरत असणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती रजिस्टर तपासणी करून त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद घेतली. तसेच, आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना केल्या. जेणेकरून रुग्णसेवेमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये, असे निर्देश उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना महापौरांनी दिले.

संपादन : अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT