Mega Block
Mega Block Sakal
मुंबई

Mega Block : रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १७ डिसेंबर २०२३ रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन जलद मार्गावर तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई माहीम ते सांताक्रूझ अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- ठाणे- कल्याण अप - डाऊन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.

कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.

पश्चिम रेल्वे

कुठे- माहीम ते सांताक्रूझ अप - डाऊन जलद मार्गावर

कधी- सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान माहीम ते सांताक्रूझ/अंधेरी स्थानकांदरम्यान सर्व जलद उपनगरीय लोकल सेवा धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द राहतील तर काही बोरिवली आणि अंधेरी गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT