file photo 
मुंबई

म्हाडाच्या घराचे स्वप्न साकार होणार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 29 : येत्या तीन वर्षांत म्हाडातर्फे पाच लाख घरांची निर्मिती करण्यात येणार असून त्यापैकी 50 हजार घरे पोलिस कर्मचाऱ्यांना व 50 हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व राज्य सरकारच्या जमिनीबाबत आढावा, तसेच ठाणे येथील शासकीय जमिनीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत सर्वसमावेशक प्रकल्प राबविण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री आव्हाड बोलत होते. 

हेही वाचा : मराठीत शिकलेत म्हणून नाकारली नोकरी..

मंत्री आव्हाड म्हणाले, सरकारकडे सध्या दहा हजार गृहसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी दहा टक्के घरे पोलिस कर्मचाऱ्यांना व दहा टक्के घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये लॉटरी काढण्यात येणार असून, एकूण 10 हजार घरांपैकी एक हजार घरे पोलिस कर्मचाऱ्यांना, तर एक हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

तसेच गरिबांसाठी परवडणारी घरे ही सरकारसाठी वेगळी आणि विकासकासाठी वेगळी अशी न बांधता एकत्रितच घरे बांधण्यात येतील व त्यांची एकत्रित लॉटरी काढण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले. 

हेही वाचा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन लेटरहेड पाहिलेत का?

यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, म्हाडा कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. माधव कुसेकर आदी अधिकारी उपस्थित होते. 


ठाण्यात 172 एकरांवर गृहप्रकल्प 
ठाण्यातील वर्तक नगर भागात म्हाडाच्या दर्शनी भागातील इमारतींचाच पुनर्विकास झाला. समान न्याय या तत्त्वानुसार म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना संपूर्ण लेआऊटचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येईल. याच तत्त्वानुसार कन्नमवार नगर, टागोर नगरांचा विकास करण्यात येईल. कळवा येथे 72 एकर, उत्तर शिव व मोघरपाडा येथे सुमारे 100 एकर जागेवर नवीन गृहप्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री आव्हाड यांनी दिली.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT