मुंबई

'अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात'

वृत्तसंस्था

मुंबई- उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईतील शिवसेना भवन परिसरात पोस्टरबाजी करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे. अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोर लावली आहेत.

राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत असतानाही राम मंदिर उभारण्याच्या मागणीवरुन सरकारविरोधात पवित्रा घेतला आहे. भाजपाला इशारा देताना उद्धव ठाकरेंच्याच आपल्या आमदारांचे राजीनामे खिशात असल्याच्या वक्तव्यावरुन मनसेने त्यांना पुन्हा एकदा छेडले आहे. शिवसेना-मनसेकडून अधूनमधून एकमेकांविरोधात राजकीय फटकेबाजी होत असते. अशा प्रकारे यापूर्वीही मनसेने शिवसेनेवर टीकात्मक पोस्टरबाजी केली आहे.


दरम्यान, आज उद्धव ठाकरे सहपरिवार खासगी विमानाने अयोध्येला रवाना झाले आहेत. तसेच त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. यानंतर उद्या उद्धव ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेऊन सभा घेणार आहेत. यामध्ये सरकारला राम मंदिर बांधण्याबाबत प्रश्न विचारले जातील. तसचे राममंदिराबाबत झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम या दौऱ्याच्या माध्यमातून करण्यात येईल असे उद्धव यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT