MNS Supports Sharad Pawar for ED inquiry  
मुंबई

कठिण प्रसंगी मनसेही शरद पवारांच्या पाठिशी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांनीही या विरोधात भूमिका मांडली. सरकारक सूडबुद्धीचे राजकारण करत आहे, असा आरोप भाजप सरकारवर केला जात आहे. अशातच मनसेनेही आपली भूमिका मांडली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी सोशल मीडियावर पवारांच्या ईडी चौकशीला विरोध करत एक पोस्ट शेअर केली आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये शरद पवारांचा फोटो व त्यावर 'सूडबुद्धी? मा. शरद पवारांवर कारवाई...' असा मजकूर लिहिला आहे. 'राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारं हे प्रकरण आता सक्तवसूली संचालनालयाने घेतलं असून त्या प्रकरणाची पूर्ण छाननी न करता त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष मा. शरद पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 5 वर्षांपासुन भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे व 2011 सालापासून ह्या प्रकरणावर तपास चालू आहे असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा तपास सक्तवसूली संचालनालयाकडे देऊन सरकार काय संदेश देत आहे? विरोधीपक्षातले नेते स्वतःकडे ओढून घ्यायचे आणि उरलेल्यांना अशा सरकारी तपास यंत्रणांची चौकशी मागे लावायची जेणेकरून विरोधीपक्षचं शिल्लक नाही राहिला पाहिजे असा सरकारचा डाव आहे. अशा प्रकारचा घाणेरडं राजकारण बघून देशात लोकशाही जिवंत आहे कि नाही हा प्रश्न पडतो? बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतमालाचा भाव, निर्यात रोडावणे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अडचणीत येणे, थकीत कर्जाचे प्रमाण वाढणे असे अनंत यक्षप्रश्न सरकारपुढे असताना त्यांना हे घाणेरडे राजकारण सुचते हे लोकशाहीला खूप घातक आहे.' असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने काही दिवसांपूर्वी कोहिनूर मील प्रकरणी चौकशी केली होती. त्यांच्यासह मनसे नेते नितीन सरदेसाई व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांचीही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीसीठी राज यांना दिवसभर ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आले होते.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT