‘माफ करा साहेब, या वेळेस तुमचं ऐकणार नाही’

ncp leader sharad pawar
ncp leader sharad pawar

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) Sharad Pawar ED Notice नोटिस पाठविली आहे. या पार्श्वभूमीवर पवार स्वतः ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचा सल्ला दिला आहे. पण, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या ट्विटवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कमेंट केली असून, ‘माफ करा साहेब ह्यावेळेस पहिल्यांदा तुमचे ऐकणार नाही,’ असे म्हटले आहे.

ठिकठिकाणी बंदची हाक
शरद पवार यांना ईडीने नोटिस पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप पक्षातील नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. एवढेच नव्हे तर, इतर पक्षातूनही पवार यांना पाठवण्यात आलेल्या नोटिस विषयी सरकारवर टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज, पश्चिम महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये बंदचं आवाहन केलंय. यात सातारा, पंढरपूर, या गावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात भावनिक ट्विट केले आहेत. ‘मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

जमावबंदी आदेश
दरम्यान, शरद पवार यांनी आज, स्वतः ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी निवडणूक कार्यक्रमात बिझी असल्याने जर, पत्र आले तर येता येणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी स्वतः हजर राहण्याचे जाहीर केले आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना मुंबईत बाहेरच पडू न देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल, अशी माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com