ठाणे : अन्न शिजवताना आंदोलक (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

पुनर्वसनासाठी ठाण्यात कातकरींनी मांडला बिऱ्हाड 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील नेतीवली येथील 13 कातकरी कुटुंबांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज ठाणे येथील सरकारी विश्रामगृहाबाहेर बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, अथवा तात्पुरती निवासाची सोय होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी आदिवासी माणूस ढोर नाय, माणूस हाय माणूस हाय, माणुसकीची भीक नको हक्क हवा, हक्क हवा या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तसेच आंदोलनाच्या ठिकाणी चुली पेटवून अन्न शिजवण्यास सुरुवात केली. 

बेघर झालेल्या आदिवासी कातकरी 13 कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसन करावे, कातकरी उत्थान अभियानांतर्गत कुळ कायदा 1948 चे कलम 16 व 17 प्रमाणे घराखालील जागा त्यांच्या नावे करावी, बेघर केलेल्या आदिवासींना तात्पुरती निवासाची व्यवस्था करा, विकासक व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, या कुटुंबांचा प्रश्‍न सोडविण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यास 26 जानेवारीला प्रजास्ताक दिनी 13 कुटुंबे व श्रमजीवी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT