अमित ठाकरेंबद्दल आजी कुंदा ठाकरे म्हणतात..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

मुंबई : आज मनसेच्या महाअधिवेशनात अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिक्षणाविषयीचा प्रस्ताव अमित ठाकरे यांनी या वेळी मांडला. अमित ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उभारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच राज ठाकरेंना अमित ठाकरे यांच्या प्रवेशामुळे आधार मिळणार आहे असं बोललं जातंय. दरम्यान अमित ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशावेळी ठाकरे कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. अमित ठाकरे यांना आजी कुंदा ठाकरे यांनी खूपसाऱ्या शुभेच्छाआहेत. 

मोठी बातमी - रेल्वेचे ४ टीसी चमकले, प्रत्येकी केली १ कोटींची वसूली, हे तर टीसी नंबर १

काय म्हणाल्या आजी कुंदा ठाकरे:

"दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते. अमित पुढे खूप चांगलं काम करणार आहे, तो खूप मोठा व्हावा”, असं मत अमित ठाकरे यांच्या आजी कुंदा ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. “गेल्या दोन-तीन वर्षात अमित काही आंदोलनांमध्ये सहभागी झाला. तो जसं काम करत आहे तसंच त्याने सुरु ठेवावं." असंही कुंदा  ठाकरे यांनी म्हंटलय. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे उद्गार काढलेत. 

मोठी बातमी - अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय झाले

आई शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया:

“मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचे आभार मानते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अमित काम करत होता. पण आता सगळ्यांनी मिळून अमितची नेतेपदी निवड केली, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. अमित याला स्टेजवर पाहून अंगावर काटा आला, असं असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितलंय. नेतेपद असतं नसतं,  मात्र तुम्ही जितकी लोकांची कामं करता तितकं तुम्ही लोकांशी जोडले जाता. महाराष्ट्रात आज शिक्षणाचे, खेळाडूंचे आणि विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न अमित नक्की सोडवायचा प्रयत्न करेल”, असंही शर्मिला ठाकरे यांनी म्हंटलय. 

reaction of amit raj thackerays grandmother kunda thackeray

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of amit raj thackerays grandmother kunda thackeray