उद्या ठाणे बंदचा वंचित बहुजन आघाडीकडून आवाज 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

नागरिकांनी सहभागी होण्याचे वंचित बहुजन आघाडीचे आवाहन 

ठाणे : सीएए आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी (ता.24) "ठाणे बंद'चे आवाहन केले आहे. या आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसक कृती केली जाणार नसून या बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या असल्याचे वंचित बहुजन आघाडीकडून कळवण्यात आले आहे. 

हेही वाचा - नागोठण्याजवळ बर्निंग कारचा थरार

या बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांच्या वतीने वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीची ठाण्यातील स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती. या बंदबाबत वंचित आघाडीने एक प्रसिद्धिपत्रक देखील सादर केले आहे. यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत सर्व सामाजिक, आर्थिक माहिती समोर येते; मग एनआरसीची वेगळी गरज काय आहे? यासारखे प्रश्‍न विचारले आहेत. तसेच ओबीसी संघटना अनेक वर्षांपासून त्यांच्या जातीनिहाय गणनेची मागणी करीत आहेत. त्यांची ती मागणी मान्य न करता, नॅशनल पॉप्युलेशन सेन्सस केली जात आहे.

महत्त्वाची बातीमी - नवी मुंबईच्या वेशीवर घडतोय हा धक्कादायक प्रकार

देशात आवश्‍यक खर्च करण्यासाठी किमान 14 लाख कोटी लागतात. सध्या सरकारकडे फक्त 11 लाख कोटी जमा झाले आहेत. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प येणार आहे. तोपर्यंत 3 लाख कोटींची ही तूट भरून निघेल असे वाटत नाही. त्यामुळे भाजप देशाला आर्थिक दिवाळखोरीकडे नेत आहे. देशात अशी परिस्थिती असताना विरोधक सरकारला हवा तसा तीव्र विरोध करीत नाहीत. त्यामुळेच आम्ही हा बंद पुकारला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राजाभाऊ चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

web title : Thane will closed tomorrow 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane will closed tomorrow