Murder
Murder Sakal
मुंबई

मुंबई : सांगून पण ऐकत नसल्याने मित्रानेच मित्राच्या डोक्यात घातला दगड

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : रहायला घर नसल्याने एका पडक्या इमारतीचा आसरा दोघा मित्रांनी घेतला होता. मात्र त्यातील एकाला महिलांचा नाद असल्याने तो तेथे महिलांना घेऊन येत असे. महिलांना घेऊन येऊ नको असे सतत सांगून पण ऐकत नसल्याने अखेर मित्रानेच मित्राची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली आहे. थापा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या चोवीस तासात आरोपी शेर बहादूर धामी या मारेकऱ्यास अटक केली आहे.

कल्याण पश्चिमेकडील एका पडीक इमारती मध्ये एका तरुणाची एका इसमाने हत्या झाल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसानी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला असता, अवघ्या 24 तासात आरोपीला गजाआड करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सांगितलं.

मयत तरुणाचे नाव हे थापा असून तो कुकचे काम करीत होता. त्याचा मित्र धामी यानेच त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यादृष्टीने तपास करत पोलिसांनी त्याला अटक करत चौकशी केली.

धामी हा मूळचा नेपाळचा आहे. तो कल्याणमध्ये बिगारीचे काम करतो. धामी आणि मयत थापा हे दोघे मित्र होते त्यांना राहण्यासाठी घर नसल्याने त्यांनी या पडीक इमारतीचा आसरा घेतला होता. थापा हा कायम या ठिकाणी महिलांना घेवून येत होता. महिलांना आणू नको असे सांगत धामिने विरोध केला मात्र थापा ऐकत नव्हता त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला याचा वादातून धांमी याने थापा याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाणे यांनी दिली.चोवीस तासात महात्मा फुले चौक पोलिसांनी मारेकऱ्याला ठोकल्या बेड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT