Rain
Rain sakal media
मुंबई

मुंबईतून पावसाची माघार; यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अखेर मुंबईतून (mumbai) पावसाने आज माघार (rain stops) घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. मुंबईत यंदा धुवांधार पाऊस बरसला (heavy rainfall) असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा (monsoon average) कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने (Meteorological department) स्पष्ट केले.

या वर्षी मुंबईत २४२४.३३ मिमी पाऊस पडला, तर गेल्या वर्षी मुंबईतील पावसाचे प्रमाण ३४१८.८४ मिमी इतके होते. त्यामुळे यंदा तब्बल ९९४.५१ मिमी कमी पाऊस पडला. २०२० मध्ये कुलाबा येथे १४५.९० टक्के, तर सांताक्रूझमध्ये १४०.०७ टक्के पाऊस झाला. २०२१ मध्ये कुलाबा १०२.८७ टक्के, तर सांताक्रूझ येथे ११७.३० टक्के पाऊस झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४३.४८ टक्के कमी पाऊस झाला.

केरळमध्ये यंदा ३ जूनला, तर मुंबईत ११ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर महिनाभर पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. जुलैमध्ये मात्र पावसामध्ये मोठा खंड पडला. त्यानंतर पावसाने जोर धरला होता. काही दिवस मुंबईकरांची तारांबळदेखील उडाली होती; मात्र पावसाने उघडीप घेतल्याचा कालावधी मोठा असल्याने तुलनेने या वर्षी कमी पाऊस झाला. शक्यतो एक ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र ११ दिवस उशिरा परतीचा पाऊस सुरू होऊन वेगाने माघारी परतला.

"पावसाचा पॅटर्न बदलला आहे. साधारणतः २८ जूननंतर पावसाने जोर धरला. मुंबईसह संपूर्ण कोकणात यंदा कमी पाऊस झाला. दुसरीकडे पाऊस पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याकडे सरकल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला."
- किरण जोहरे, आंतरराष्ट्रीय ढगफुटी व हवामान तज्ज्ञ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ राममंदिरावर बुलडोझर घालतील; पंतप्रधान मोदींची ‘सप’, ‘काँग्रेस’वर टीका

Parveen Hooda : ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का; परवीन हुड्डा पॅरिस ऑलिम्पिक कोटा गमावणार?

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Shashank & Gashmeer : शशांक-गश्मीरची पुन्हा जमली जोडी; 'या' प्रोजेक्टमध्ये करणार एकत्र काम

SCROLL FOR NEXT