पालिका म्हणते! वाजवा रे वाजवा; पण परवानगी घेऊन... 
मुंबई

पालिका म्हणते! वाजवा रे वाजवा; पण परवानगी घेऊन...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन असले तरी लग्नाळूंना दिलासा देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेऊन लग्न करता येणार आहे; मात्र वऱ्हाडींची संख्या मर्यादित ठेवावी लागणार आहे. तसेच मत्स्य उद्योगासंबंधी सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मासळी बाजारही सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईतील 452 ठिकाणे वगळता इतर ठिकाणी सोमवारपासून (ता. 20) कामकाज सुरू करण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. हे व्यवहार सुरू करताना कामकाजाच्या ठिकाणी आवश्‍यक सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे. तसे न केल्यास संबंधितांना एक वर्षाची कैद होऊ शकते. याव्यतिरिक्त पानटपऱ्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यांना परवानगी 

  • वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कारखाने 
  • ऑनलाईन शॉपिंग 
  • महिलाश्रम, वृद्धाश्रम, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी 
  • अत्यावश्‍यक दुकाने नियमित वेळेत सुरू राहणार 
  • दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या मालवाहतुकीला परवानगी 
  • कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या सुविधा पुरवणे 
  • कामाच्या ठिकाणी मास्क तसेच सामाजिक अंतर बंधनकारक 
  • प्रवासासाठी परवानगी आवश्‍यक 
  • परिसराचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण 
  • दुचाकीवर एक व्यक्ती, चार चाकीत चालकासह एक व्यक्ती, बसमध्ये 30 टक्के प्रवासी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT