उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी यांच्या नावाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 एप्रिल 2020

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी कोलकात्याचे न्या. दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअम मंडळाने केली आहे. 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी कोलकात्याचे न्या. दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअम मंडळाने केली आहे. 

ही बातमी वाचली का? '...या' शहरांमध्ये राज्य सरकारकडून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकांची नेमणूक

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी 27 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. न्या. दत्ता हे कोलकाता उच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. कोलकाता विद्यापीठामधून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून, जून 2006 मध्ये त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर नियुक्ती झाली. 

ही बातमी वाचली का? सोमवारपासून 'ही' कटकट लागणार तुमच्या मागे! राज्य सरकारचा निर्णय...

याशिवाय मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर कोलकात्याचे न्या. विश्‍वनाथ सोमादर यांची नियुक्ती करण्याची शिफारसही मंडळाने केली आहे. सध्या न्या. सोमादर हे अलाहाबाद उच्च न्यायालयात रुजू आहेत. कॉलेजिअम मंडळाने शनिवारी (ता. 18) केंद्र सरकारला यासंबंधी शिफारस केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice Dutta's recommendation for the post of Chief Justice of the High Court