मुंबई

द्राक्षांचा हंगाम सुरू, दहा किलो 1200 रुपये 

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - थंडीबरोबरच द्राक्षांचा हंगामही सुरू झाला असून वाशी येथील फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या सीडलेस द्राक्षांना अधिक मागणी असून, प्रति दहा किलो 800 ते 1200 रुपयांपर्यंत दर आहे. 

यंदा परतीच्या पावसाचा फटका बसल्याने द्राक्षांचा हंगाम काही दिवसांसाठी लांबला. अखेर नाशिक व सांगलीतील तासगाव परिसरातून द्राक्षे बाजारात दाखल झाली आहेत. सध्या हिरवी द्राक्षे बाजारात येत असून, काही दिवसांनंतर काळी द्राक्षे बाजारात येण्यास सुरुवात होईल. सध्या सोनाक्का व शरद सीडलेस द्राक्षांची आवक होत आहे. त्यात सोनाक्का जातीच्या द्राक्षांच्या दहा किलोच्या टोपलीला 400 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे; तर शरद सीडलेसला 800 ते 1200 पर्यंत दर आहे. येत्या एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहण्याची अपेक्षा असून, डिसेंबरपर्यत मोठ्या प्रमाणात आवक होईल. या काळात दर कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT