मुंबई

परीक्षेत पुरवणी घेण्यास मनाईबाबत खुलाशाचे निर्देश 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ऑनलाईन गुण तपासणी पद्धतीत पुरवणी त्रासदायक ठरण्याच्या शक्‍यतेमुळे विद्यार्थ्यांना पुरवणी घेण्यास मनाई करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. याबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. 

विद्यापीठाने यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये जारी केलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेत पुरवणी किंवा अतिरिक्त उत्तरपत्रिका घेण्यास मनाई केली आहे. या निर्णयाविरोधात मानसी भूषण या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीने ऍड. विशाल कानडे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. बी. आर. गवई आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. ऑनलाईन गुण तपासणी पद्धतीमध्ये अतिरिक्त पुरवणी हा अडथळा ठरू शकतो. यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर अतिक्रमण होत असून, हा निर्णय चुकीचा आहे, असा युक्तिवाद याचिकादाराच्या वतीने करण्यात आला. 

विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी सुमारे 37 पानांची उत्तरपत्रिका देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेचा बारकोड आणि पुरवणीचा बारकोड यात तफावत असते. त्यामुळे तपासणीच्या कामात यापूर्वी गोंधळ झाला होता, असे विद्यापीठाच्या वतीने ऍड. रुई रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. याचिकादाराने ऐन परीक्षेच्या आधी जाणीवपूर्वक याचिका दाखल केली आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला. येत्या शनिवारपासून (ता. 16) परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी गुरुवारी (ता. 14) ठेवली असून विद्यापीठाला खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT