Mumbai Rain Update sakal
मुंबई

Mumbai Rain Update:मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका,रेल्वे रुळांवर साचलं पाणी

Mumbai Mega Block Update: मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला

सकाळ वृत्तसेवा

Mumbai: दोन दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे, रस्ते आणि विमान सेवांना फटका बसला आहे. त्यातच रविवारी मुंबई उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला होता.

त्यातच विक्रोळी रेल्वे स्थानकांवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले होते. रविवार मेगाब्लॉक आणि त्यात पावसामुळे मुंबईकरांना दुहेरी फटका बसला आहे.

मुंबई तसेच उपनगरांत रविवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई,नवी मुंबई,ठाणे शहराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. कल्याण,कर्जत,खोपोली,कसारा या भागात मुसळधार पाऊस असल्याने मुंबईकडे येणाऱ्या लोकल,मेल-एक्सप्रेसचा वेग कमी झाला होता. रविवारी सुट्टी असलेल्यांने मध्य रेल्वेने मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर नियोजित मेगा ब्लॉक घेतला होता.

त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावर वळवण्यात आल्याने धीम्या मार्गावरील लोकल सेवांना फटका बसला होता. त्यातच रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाहूर ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल,मेल-एक्सप्रेसचा वेग कमी झाला होता. त्यामुळे लोकल,मेल-एक्सप्रेसच्या वेगावर निर्बंध आल्याने गाड्या उशिराने धावतात.

रेल्वे रुळावर पाणी साचल्याने आणि पावसामुळे हवेतील दृष्यमानता कमी असल्याने गाड्यांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना मोटरमनला देण्यात आलेल्या होत्या. यामुळे लोकल,मेल-एक्सप्रेसच्या वेगावर निर्बंध आले होते. तसेच विक्रोळी रेल्वे स्थानकात दुपारी दीड वाजता सुमारास तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवली होती. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा १५ मिनिटे खोळंबल्या होत्या. पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे मेन लाईनवरील लोकल ३० ते ४० मिनिटे तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल देखील ३० ते ३० मिनिटे उशिरा होता.यामुळे प्रवाशांना सुट्टीचा दिवशी दुहेरी फटका बसला आहे.

विद्याविहार रेल्वे स्थानकांचा प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने ठाणेकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या होत्या. प्लॅटफॉर्मवर एक वरील रेल्वे रुळावरून पाण्याचा पाट वाहत असल्याने लोकल कासव गतीने येत होती तसेच घाटकोर ते विक्रोळी दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील रेल्वे नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या. तसेच नाल्याचे पाणी रेल्वे रुळावर आल्याने ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या लोकल सेवा खोळंबल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT