मुंबई

नवी मुंबईत लक्झरी बस आऊट ऑफ कंट्रोल, थेट भिंतीला धडक

पूजा विचारे

मुंबईः नवी मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.  मुंबई -पुणे हायवेवर कामोठे येथे हा अपघात झाल्याचं समजतंय. भरधाव आलेली बस थेट रस्त्याजवळ असलेल्या डिव्हाडरमध्येच घुसली. या भीषण अपघातात १५ जण जखमी झाले. दरम्यान सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

बुधवारी सकाळी नवी मुंबईजवळच्या कामोठे येथे मुंबई पुणे हायवेवर हा अपघात झाला. एका खासगी ट्रव्हल्सची बस कोल्हापूरवरून ३० ते ४० प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेनं येत होती. कामोठेजवळच्या हायवेवर येताच अचानक ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याजवळच्या डिव्हाडरवर जाऊन जोरदार धडकली. ही बस भुयारी मार्गासाठी बनवण्यात आलेल्या भितींत जाऊन घुसली.

ही धडक इतकी भीषण होती की, भरधाव वेगानं आलेल्या बसचा समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात ड्रायव्हर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या बसमधील आणखी १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवाशी प्रवास करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर ही बस भिंतीत जाऊन अडकली होती. त्यामुळे बस काढण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढलं. सध्या जखमी झालेल्या प्रवाशांवर कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Navi Mumbai private travels bus terrible accident

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT