एनएमएमटी देशातील सर्वोत्कृष्ट वाहतूक व्यवस्था
एनएमएमटी देशातील सर्वोत्कृष्ट वाहतूक व्यवस्था 
मुंबई

एनएमएमटी देशातील सर्वोत्कृष्ट वाहतूक व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : देशातील सार्वजनिक परिवहन क्षेत्रात ‘इन्टीग्रेटेड इन्टेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केल्याची दखल घेत केंद्र सरकारतर्फे नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेला सर्वोत्कृष्ट यंत्रणा म्हणून पुरस्कार देण्यात आला. सरकारच्या गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाने २०१९ साठी सार्वजनिक परिवहन क्षेत्रातील मानाचा ‘कमांडेबल इनेशेटीव्ह इन अर्बन ट्रान्स्पोर्ट’ हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार ‘बेस्ट सिटी इन अर्बन ट्रान्स्पोर्ट इनिशिटीव्ह’ या प्रवर्गात देण्यात आला. 

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने इन्टीग्रेटेड इन्टेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम प्रणाली अंतर्गत उपक्रमाची ०३ बस आगारे व १५ नियंत्रण कक्षाचे संपूर्ण संगणकीकरण केले आहे. सीबीडी-बेलापूर येथील मुख्यालयात अत्याधुनिक व सुसज्ज अशा स्वतंत्र मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षास ०३ बस आगारे व १५ नियंत्रण कक्ष जोडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण वाहतुकीचे ऑनलाईन दैनंदिन कामकाज करण्यात येत आहे. उपक्रमाने प्रवासी हा केंद्रबिंदू मानून व नवी मुंबई शहरातील बसस्थानके व मुख्य बस थांब्यावर प्रवाशांना मार्गदर्शक ठरतील. असे पीआयएस व एलईडी टीव्ही स्क्रीन बसवले आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सोईसाठी एनएमएमटी बस ट्रॅकर हा स्वतंत्र मोबाईल ॲप कार्यान्वित केला आहे. याद्वारे प्रवाशांना बसच्या अचूक वेळेची माहिती, येणारी बस कोणत्या बस थांब्यावर आहे. प्रसारमाध्यमांसहित एसएमएसद्वारे प्रवासाची माहिती व बसमार्गाची माहिती; तसेच बस आगमनाचा अलार्म यासारख्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसेच या मोबाईल ॲपद्वारे तिकीट, पास काढणे, डिजिटल पेमेंटच्या दृष्टीने स्मार्ट कार्डद्वारे तिकीट उपलब्ध करून देणे आदी सुविधा आयटीएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात येत आहेत. याबरोबरच या प्रणालीद्वारे चालक-वाहकांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यास मदत मिळत आहे. वेगात अथवा हळू बसेस चालविणारे, प्रवासी थांब्यावर असताना बस न थांबविणारे चालक/वाहक यांची अचूक माहिती परिवहन प्रशासनास प्राप्त होत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

१७ नोव्हेंबरला होणार पुरस्कार सोहळा
लखनऊ येथील ‘इंदिरा गांधी प्रतिष्ठान’मध्ये केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे शहर परियोजना व प्रदर्शनात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

SCROLL FOR NEXT