मुंबई

महाड तालुक्यात कोरोनाचा फैलाव थांबता थांबेना; आज सापडले तब्बल 'इतके' रुग्ण...

सुनील पाटकर

महाड : राज्यासह अलिबाग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही महाड तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 15 जुलैपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही एवढ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे.

महाड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी महाड शहरात 9 रुग्ण तर तालुक्यामध्ये 32 अशा एकूण 41 नव्या रग्णांची नोंद झाली आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढतच चालला आहे. शुक्रवारी तालुक्यात 43 रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा नव्याने 41 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महाड शहरातील रोहिदास नगर, दस्तुरी नाका, चवदार तळे, प्रभात कॉलनी, कोटेश्वरी तळे, काकर तळे तर तालुक्यातील बिरवाडी गावांमध्ये नागलवाडी, नडगाव, आसनपोई, चांभांरखिंड, वरंध, काळीज, भावे पठार, शेल, तुडील, शेलटोली, चोचिंदे, गांधारपाले, रुपवली, आकले, कुसगाव, मोहोप्रे, कांबळे या गावात रुग्ण आढळले आहेत. महाड एमआयडीसीनजीकच्या गावातही रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यात सध्या 168 जणांवर उपचार सुरु असून 18 जणांचा मृत्यू झाला आहेत.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रायगड जिल्हयात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. परंतु जिल्ह्यातील काही नागरिक आणि विविध संघटनाने लॉकडाऊन न करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. त्यांच्या या मागणीला दुजोरा देत जिल्ह्यातील लॉकडाऊन दोन दिवसांपूर्वीच समाप्त करण्यात आले. 24 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन थांबविण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT