मुंबई

श्रीवर्धनसह जिल्ह्यातील नऊ प्रकल्प रखडले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : श्रीवर्धन तालुक्‍यातील बोर्लीपंचतन येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. हे काम सहा वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या अपूर्ण इमारतीमध्ये मद्यपींनी अड्डा बनवला आहे. अशीच बिकट स्थिती जिल्ह्यातील नऊ संकुलांची आहे. त्यामुळे शहरांप्रमाणेच गावांमध्येही क्रीडापटू घडवण्यासाठी सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खेळखंडोबा झाला आहे.
श्रीवर्धन तालुका क्रीडा संकुलाचे ३ मे २०१३ रोजी भूमिपूजन करण्यात आले. २०१४ मध्ये कामास सुरुवात झाली. त्याचे कंत्राट सिरोया कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले आहे. संकुलाच्या छपरासह अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत.

फक्त पाचच संकुले पूर्ण
जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुका क्रीडा संकुलांची कामे रखडली आहेत. यातील तीन तालुक्‍यांत प्रशासनाला अद्याप जागाच मिळाली नाही. अलिबाग, मुरूड आणि पोलादपूर तालुक्‍यांचा समावेश आहे; तर महाड, श्रीवर्धन, म्हसळा, खालापूर या तालुक्‍यातील संकुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. तळा, पेण, माणगाव, पनवेल आणि रोहा या पाच तालुक्‍यांतील संकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. सुधागड तालुक्‍यातील संकुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हस्तांतर प्रक्रिया अपूर्ण आहे.

असे आहे क्रीडा संकुल
तालुका क्रीडा संकुलांसाठी सुमारे दोन हेक्‍टर जागा आहे. त्यात एक दोनशे मीटर लांबीचा इनडोअर बहुउद्देशीय हॉल, दोनशे मीटरची धावपट्टी आणि विविध खेळांची क्रीडांगणे उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, काही ठिकाणी जागेमुळे तर काही ठिकाणी निधीमुळे संकुले रखडली आहेत.

कसे होणार खेळाडू ?
ग्रामीण भागातील होतकरू मुलांना खेळात नैपुण्य मिळवण्याची संधी देण्यासाठी संकुले उभारण्यात येत आहेत. मात्र, जिल्हास्तरावरील संकुल मार्गी लागले असले तरी तालुकास्तरीय मात्र अनेक ठिकाणी रखडले आहेत.

14 तालुक्‍यांचा भार चौघांकडे
जिल्हा क्रीडा अंतर्गत 13 पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पेण तालुका क्रीडा अधिकारी, एक क्रीडा अधिकारी, दोन क्रीडा मार्गदर्शक अशी फक्त चार पदे भरली आहेत. पेणच्या तालुका क्रीडा अधिकाऱ्यांकडे जिल्हा क्रीडा अधिकारीपदाचा अतिरिक्त भार आहे. चौघांना चौदा तालुक्‍यांचा भार सांभाळताना मोठी कसरत करावी लागते.

जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंचा सराव विविध तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांतील संकुलांची कामे पूर्ण आहेत. तीन तालुक्‍यांचे कामांचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यात येत आहेत. तीन तालुक्‍यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे; तर उर्वरित तीन तालुक्‍यांसाठी जागा प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- अंकिता मयेकर, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी

क्रीडा विभागाने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागातील मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न अपेक्षित आहेत. श्रीवर्धनमधील क्रीडा संकुल लवकर सुरू व्हावे.
- उद्देश वागजे, कब्बडीपट्टू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT