मुंबई

पीएच.डी. प्रवेश परीक्षा प्रथमच ऑनलाईन 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठ पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) प्रथमच ऑनलाईन घेत आहे. या पेट परीक्षा 16 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज 6 ते 23 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 2016 च्या निर्देशानुसार विद्यापीठाने पीएच.डी. व एमफील प्रवेशाच्या संदर्भात कुलगुरूंचे निर्देश प्रसिद्ध केले होते. या आधारावर 2018 ची पीएच.डी. व एमफील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन असतील. विद्यार्थ्यांना त्याची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्‍यकता नाही; परंतु अर्जाची प्रत पुढील संदर्भासाठी काढून ठेवावी. या परीक्षेचे अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्‍यकता नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रता पाहूनच प्रवेश अर्ज भरणे आवश्‍यक आहे. 

ही परीक्षा 4 विद्याशाखांमधून 78 विषयामध्ये घेतली जाणार आहे. संबंधित पेट परीक्षेचे प्रवेशपत्र 10 डिसेंबरपासून उपलब्ध होतील. ऑनलाईन अर्ज उमेदवारांना विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर 6 नोव्हेंबरपासून उपलब्ध असणार आहेत. ही परीक्षा ऑनलाईन आहे. संशोधन पद्धती व विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विषयावर आधारित असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT