Untitled-1.jpg
Untitled-1.jpg 
मुंबई

कळवा, विटाव्यातील रस्ते 'खड्ड्यात'; वाहनचालक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

कळवा : गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कळवा, विटावा परिसरातील रस्त्यांवर काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहनचालकांना गाड्या चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच काही ठिकाणी रस्त्यावर ड्रेनेजचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे

आधीच पावसाची सतत रिपरिप सुरू असताना खड्डयात पाणी साचत असल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी कळवा, विटावा व खारीगाव येथील नागरिकांनी केली आहे. कळवा खारीगाव मधून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर सह्याद्री शाळेजवळ मोठे मोठे खड्डे पडले आहेत. तसेच ठाणे बेलापूर रस्त्यावर गणपती पाडा बस थांब्याजवळील गतिरोधकाच्या आसपास मोठे खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहन चालकाना मोठ्या जिकरीने आपल्या गाड्या चालवाव्या लागत आहेत. येथे मागील आठवड्यात एक दुचाकीचालक पडून जखमी झाल्याचे विटावा येथील नागरिकांनी सांगितले. कळवा सहयाद्री शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदाराने ड्रेनेज बांधण्याचे काम सुरू केले असून ते संथ गतीने सुरू आहे.

 वाहन चालकांना त्याचा फटका बसत असून येथे सकाळ व संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असते. येथे काही दिवसांपूर्वी रस्त्याचा भाग खचल्याने ट्रक अडकून पडला होता. तसेच कळवा खाडी पुलावर पडलेल्या खड्डयामुळे आधीच वाहतूक कोंडीने त्रासलेल्या वाहनचालकाना या खड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवले जात नसल्याने या खड्डयामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT