file photo
file photo 
मुंबई

थॉमसचा मुक्काम आर्थररोडमध्ये!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेला बॅंकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याला गुरुवारी न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आर्थररोड तुरुंगात करण्यात आली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या माजी संचालक सुरजित सिंग अरोरा याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

सुरजित सिंग याची हा गेल्या 10 वर्षांपासून "पीएमसी'मध्ये संचालक होता. गैरव्यवहार झालेल्या 44 बॅंक खात्यांऐवजी कमी ठेवी असलेल्या 20 हजार 149 खात्यांमध्ये हे व्यवहार झाल्याचे दाखवण्यात आले. या 44 खात्यांपैकी 10 खाती एचडीआयएल ग्रुपच्या राकेशकुमार वाधवा यांची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 31 ऑगस्ट 2019 नुसार या खात्यावरून दोन हजार आठ कोटी रुपये शिल्लक आहेत. बॅंकेत 4,355 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) केली होती. त्यानंतर बॅंकेच्या व्यवस्थापनातील थॉमस यांच्या जबाबाच्या आधारावर वित्त कर्ज देताना काही अनिमितता असल्याचे उघड झाले होते. ही अनिमितता 2008 नंतरची असल्याचे दिसून आल्यामुळे तेव्हापासूनचे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान "ईओडब्ल्यू'समोर आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या प्रशासकाने याप्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर भांडुप पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या बॅंकिंग दोन कक्षाला वर्ग करण्यात आला होता. सध्या याप्रकरणी विशेष तपास पथक तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT