raju patil
raju patil sakal
मुंबई

Raju Patil : गद्दारांना मदत नाही; आमदार राजू पाटील यांचा राग कोणावर

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली, त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. आमच्या भावना आम्ही राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवू असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यावर आपला राग व्यक्त करत इशारा देऊ केला आहे.

आमच्या भावनांपेक्षा अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश महत्वाचा असेल असे देखील ते नंतर म्हणाले.आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी डोंबिवली येथे संवाद साधला असता वरील इशारा दिला आहे.

मनसेचा कोणाला पाठींबा असेल याविषयी बोलताना त्यांनी आमचा उमेदवार या ठिकाणी ठरलेला नाही. तसेच राज साहेबांचे आदेश आलेले नाही त्यामुळे इथे कोणाच्या पार्टीत जायचं हे ठरलं नाही असे सांगितले.

महायुतीत जाणार असं काही राज ठाकरे म्हटले नाही. आम्ही त्यांना विचारलं पुढची दिशा काय असेल गुढीपाडव्याचा मेळावा असतो त्यावेळेला दिशा देणार असल्याचे सांगितले.

ते काय बोलतील यावर आमदार म्हणाले, राज साहेब काय बोलतील ते शर्मिला वहिनी ही सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांगू. मात्र ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील. मराठी माणसाच्या हिताच्या बोलतील त्याची गॅरंटी आम्हाला आहे.

महायुतीतील वादावर आमदार पाटील म्हणाले, पाहिले ही लोक एकत्र लढलेली मात्र त्यात अजून एक गट सामील झाला आहे. लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभेला. पालिका लेव्हललाही या गोष्टी घडणार त्यावेळेला यांची युतीही नसेल.

वैशाली दरेकर

शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांची साथ धरली होती. 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक देखील मनसे पक्षाकडून लढली. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे व शिवसेनेचे आनंद परांजपे यांचे आव्हान होते. त्यांनी त्यावेळी 1 लाख मते घेत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर मार्च 2016 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता ठाकरे गटातच राहणे पसंत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT