कशेडी घाट
कशेडी घाट 
मुंबई

कशेडी टॅपच्या हद्दीत आठ महिन्यांत ३२ अपघात; तीन मृत

देवेंद्र दरेकर : सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या कशेडी टॅप महामार्गाच्या अधिपत्याखाली रायगड जिल्ह्यातील कशेडी घाट, तर रत्नागिरी जिल्हा हद्दीत खेड भोस्ते घाटपर्यंतचा परिसर येत आहे. या मार्गावर जानेवारी १९ ते ऑगस्ट १९ पर्यंत ३२ अपघात झाले असून, यात तीन प्रवासी मृत्यू झाले आहेत. 

या पावसाळ्यात कशेडीसह भोस्ते घाट परिसरात दरडसह माती खाली येणे, जगबुडीवरील पूल आदींबाबत कशेडी पोलिसांनी दिवस रात्र योग्य नियोजन करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. कशेडी घाट परिसरात सातत्याने ट्रक, टॅंकर, टेम्पो, कंटेनर आदी पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. यातील बहुतांशी अपघात नियंत्रण सुटल्याने किंवा समोरून एखाद्या वाहनाने हुल दिल्याने झाल्याचे निदर्शनास आले. महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलिस विविध उपक्रम राबवत आहेत. अनेकदा महामार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात येत असून, दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

अपघात रोखण्यासाठी प्रवासी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन यशस्वी करण्यात आले आहे; मात्र मार्गावरील वळणे चढउतार आदी ठिकाणी अपघात होत आहेत. सणासुदीच्या काळात महामार्ग पोलिस केंद्राकडून वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले होते. धामनदेवी परिसरात तीन वेळा दरड खाली आल्याने तातडीने सर्व यंत्रणा कार्यरत राहून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली होती. 

२०१९ मध्ये जानेवारी ते ऑगस्टपर्यंत जवळपास ७ हजार ५०३ वाहनांवर कारवाई केली असून, त्यापोटी १६ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंडवसूल करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक कारवाई मे महिन्यात करण्यात आली आहे, अशी माहिती कशेडी टॅपच्या वतीने देण्यात आली आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

Pushpa 2: 'पुष्पा-2'मध्ये समंथा नाही तर 'ही' अभिनेत्री करणार आयटम साँगवर डान्स? चर्चांना उधाण

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले, 4 जणांचा मृत्यू

Indapur Crime News : इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञाताने केला हल्ला

Latest Marathi News Live Update: पुणे पोर्श प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास सुरु: पुणे पोलीस आयुक्त

SCROLL FOR NEXT