मुंबई

रिपब्लिक टीव्हीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा; CEO विकास खानचंदानी यांनाही जामीन मंजूर

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 16 : फेक टीआरपी प्रकरणी आज रिपब्लिक टीव्हीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत रिपब्लिकच्या मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह संबंधित अधिकार्यावर कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली.

फेक टीआरपी प्रकरणात पोलिस तपास करु शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. रिपब्लिकच्या वतीने एआरजी आऊटलिअर मिडियाने न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर आज न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी पुढील ऑनलाईन सुनावणी होणार असून, ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. तोपर्यंत हा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने याचिकेवर भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना आज सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मागील दोन दिवसापासून ते अटकेत होते. पन्नास हजारांच्या जात मुचलक्यावर रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  

( संपादन - सुमित बागुल )

republic tv CEO vikas khanchandani get bail relief to republic tv by bombay high court 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Lalit Modi: हा कसला मूर्ख खेळ आहे?’ सचिन द्रविडसह दिग्गजांनी २००७ च्या T20 World Cup ला दिला होता नकार, ललित मोदींचा खुलासा..

Numerology : टॉम अँड जेरीसारखे असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुझं-माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना, शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं नातं

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT