
मुंबई, ता. 16 : पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कारकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यावेळी अजित पवार बोलत होते. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.
राजकीय जीवनात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 30 वर्षे काम करतोय. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचं काम मी पाहत आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असून आमची मदत करण्याची भूमिका असणार आहे. आता कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील असे काम करावे लागणार आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
देशासमोर शेतकर्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. केंद्राकडून प्रश्न सोडवले जात नाहीय. मात्र आम्ही सर्व घटकांना न्याय देणारे आहोत. इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
ताकद वाढविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. कोल्हापूर जिल्हयात आणखी चांगली संघटना वाढवूया. इचलकरंजी, हातकणंगले या भागातील बर्याच प्रश्नांना दादांनी न्याय दिला आहे. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.
महत्त्वाची बातमी : मुंबईतील सांडपाण्यात कोरोना विषाणू; ICMR चा अहवाल मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय
भाजपने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे. 2021 मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन माजी आमदार राजीव आवळे यांनी प्रवेश करताना दिले.
Former MLA Rajiv Awale joined NCP big blow to BJP maharashtra
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.