patwardhan park bandra
patwardhan park bandra sakal
मुंबई

Mumbai Agitation : वांद्रेतील पटवर्धन पार्क वाचविण्यासाठी रहिवासी एकवटले; भूमिगत वाहनतळाला विरोध

सकाळ वृत्तसेवा

खुल्या जागांवर, मैदानाच्या जागेवर इतर कोणतीही कामे होऊ नये, इमारती बनविण्यात येऊ नये म्हणून ती काम बंद पाडण्यासाठी यापूर्वी मोर्चे निघालेले आपण पहिले आहे.

मुंबई - खुल्या जागांवर, मैदानाच्या जागेवर इतर कोणतीही कामे होऊ नये, इमारती बनविण्यात येऊ नये म्हणून ती काम बंद पाडण्यासाठी यापूर्वी मोर्चे निघालेले आपण पहिले आहे. मात्र खार-वांद्रे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांसाठी असलेले वांद्रे पश्चिम येथे असणारी पटवर्धन पार्क ही जागा खेळण्यासाठी राखीव करावी. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्तावित केलेले भूमिगत वाहनतळ रद्द करावे यामागणीसाठी क्रिकेट मॅचचे आयोजन करत आंदोलन केले. रहिवाशांना एकत्रित आणण्यासाठी 'come, Batforpatwardhanpark' असे आवाहन करणारे एक ट्विटर अकाउंट देखील यांनी सुरू केले आहे.

या क्रीडांगणाच्या एका भागात होणाऱ्या पार्किंगच्या बांधकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इथे बीएमसीने तीन मजली भूमिगत पार्किंगसाठी निविदा काढली होती, याला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

यातील आंदोलक निधी चतुर्वेदी यांनी माहिती देताना सांगितले, महानगरपालिका आणि स्थानिक राजकारणी यांच्याकडे आम्ही खूप विनवण्या केल्या. यानंतर आम्ही रहिवासी आता शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेणेकरून उद्यानात नियमित क्रीडा स्पर्धा आयोजित करता येतील. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही उद्यानात नियमितपणे खेळणाऱ्या तरुणांना एकत्र आणत एक क्रिकेट सामना आयोजित केला. हे पार्क वाचवण्यासाठी याभागातील अनेक रहिवाशी एकवटले आहेत. ही जागा पडीक असल्याचा दावा खोटा, असल्याचेही चतुर्वेदी यांनी यावेळी सांगितले.

निधी चतुर्वेदी यांनी पुढे सांगितले की,“त्यांना जी जागा काढून घ्यायची आहे. इथे रोज २०० मुलं दिवसभरात खेळण्यासाठी येतात. हे उद्यान घोषित करावे अशी आमची कायमच मागणी आहे. या परिसरातील मुलांसाठी एक महत्त्वाचे खेळाचे मैदान आहे. इथे वाहनतळाची आवश्यकता नसताना हे उभारले जात आहे. आम्हाला नक्कीच आशा आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या या प्रस्तावाचा पुनर्विचार करेल आणि पर्यायी जागा शोधेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT