संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ज्येष्ठांसाठी खुले; इतरांनाही लवकरच परवानगी! 
मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ज्येष्ठांसाठी खुले; इतरांनाही लवकरच परवानगी!

कृष्ण जोशी

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुरुवारपासून (ता. 5) ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अन्य नागरिकांसाठीही उद्यान लवकरच खुले केले जाईल, असे आश्वासनही या वेळी देण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे एप्रिलपासूनच उद्यान सर्वांसाठी बंद करण्यात आले होते. अनलॉकनंतर उद्यानेदेखील सर्वांसाठी खुली करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. उद्यानबंदीचा सर्वात जास्त फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. दहिसर ते कांदिवली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी ही बाब मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सुर्वे यांनी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर उद्यान प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांच्याबरोबर ही बैठक झाली. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी तरी सकाळी मॉर्निंग वॉकसाठीचा भाग खुला करण्याची मागणी सुर्वे यांनी केली होती. त्यानुसार ज्येष्ठांच्या मॉर्निंग वॉकसाठी गुरुवारपासून उद्यान खुले करण्यास अधिकाऱ्यांनी या बैठकीत संमती दिली आहे. तसेच अन्य लोकांसाठीही उद्यान खुले करण्याबाबत विचार केला जाईल, अशी हमीदेखील अधिकाऱ्यांनी सुर्वे यांना दिली आहे. 

-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT