school prayer 
मुंबई

मुलांनो तयारीला लागा! 'या' दिवसापासून शाळा सुरु होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजला आहे. सध्या राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. याच दरम्यान सर्व व्यवहारासह शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यातच आता राज्य सरकार 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी असे संकेत दिले आहेत. 

राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले 48 तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं आहे. तसंच राज्यातील शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू करण्यात येतील. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रेड झोनमधील अन्य 15 शहरे आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं असल्याचं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

शिफ्टमध्ये वर्ग चालवणं, शाळेचे तास कमी करणं, सकाळच्या शाळेत होणाऱ्या प्रोग्रामवर बंदी घालणं आणि क्रीडा उपक्रम राबवण्याच्या योजनांची माहिती यावेळी गायकवाड यांनी मुलाखती दरम्यान दिली आहे. शाळा सुरु झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

असे आहेत दोन पर्याय:

पहिल्या पर्यायात विद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्यात येईल. त्यात सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचा विचार केला जात आहे. दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून एक दिवसाआड शाळेत बोलवायचं. तसंच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी असेल अशा सूचना देण्यात येतील.

या दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करत असून शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होईल असं शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे. शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सरकारनं नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र मुंबईतील रेड झोनमध्ये असलेल्या इतर शाळांमध्ये याचा विचार होऊ शकत नाही. शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेपूर्वी काही गोष्टी सुधारण्याची गरज असल्याचे संकेत शिक्षणमंत्र्यांनी दिलेत.

schools may start from this date read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT