esakal | काय सांगता! ऑनलाईन मिळतोय 'प्लाज्मा'?...जाणून घ्या यामागचं सत्य
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात तब्बल १ लाख ३० हजारांच्या वर लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यावर अजून कुठल्याही प्रकारचं औषध किंवा लस मिळू शकली नाही आहे. मात्र देशात आता यावर उपाय म्हणून प्लाज्मा थेरपीचे प्रयोग केले जात आहेत. मात्र आता या प्लाज्माची चक्क ऑनलाईन विक्री सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

काय सांगता! ऑनलाईन मिळतोय 'प्लाज्मा'?...जाणून घ्या यामागचं सत्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात तब्बल १ लाख ३० हजारांच्या वर लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यावर अजून कुठल्याही प्रकारचं औषध किंवा लस मिळू शकली नाही आहे. मात्र देशात आता यावर उपाय म्हणून प्लाज्मा थेरपीचे प्रयोग केले जात आहेत. मात्र आता या प्लाज्माची चक्क ऑनलाईन विक्री सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्लाज्मा म्हणजे नेमकं काय?

कोरोनाग्रस्तांच्या शरीरात विषाणूंचा सामना करण्यासाठी स्वतःहून काही सेल्स निर्माण होत असतात आणि हे सेल्स रुग्णांच्या रक्तात निर्माण होतात. शरीरात असणाऱ्या घटक विषाणूंचा नाश करण्यासाठी हे सेल्स अँटीबॉडीज तयार करतात यालाच प्लाज्मा म्हणतात. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तात प्लाज्मा अनेक दिवस राहतो. त्यामुळेच डॉक्टर अशा लोकांचं रक्त घेऊन त्याचा उपयोग इतर रुग्णांना बरं करण्यासाठी करताहेत. मात्र आता हा प्लाज्मा ऑनलाईन मिळायला सुरुवात झाली आहे. 

मोठी बातमी! मुंबईची लाईफलाईन टप्प्याटप्प्यानं लवकरच सुरु होणार? 

मुंबईत प्लाज्माची ऑनलाईन विक्री:

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातून रक्त घेऊन या रक्ताची ऑनलाईन विक्री केली जातेय. सायबर गुन्हेगारांकडून ही अवैध विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव हा मुंबईत आहे.  त्यामुळेच मुंबईत या अवैध प्लाज्माची विक्री होतं असल्याचं समजतंय. या प्रकरणी मुंबई पोलिस आता गुन्हेगारांचा शोध घेत असून अधिक तपास सुरु केला आहे. 

संपूर्ण जगात प्लाज्मा थेरपीचा प्रयोग रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केला जात आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच हे सायबर गुन्हेगार ऑनलाईन प्लाज्माचा काळाबाजार करताहेत. प्लाज्मा खरेदी केल्यामुळे तुम्ही कोरोनापासून बचाव करू शकता, अशा प्रकारचे दावे या सायबर गुन्हेगारांकडून केले जात आहेत.  

हेही वाचा: मुंबईकरांना आता नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अधिक माहिती

‘आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच या सायबर गुन्हेगारांवर कारवाई करू. तसंच सोशल मीडियावर चुकीच्या पोस्टद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवरही आमची नजर आहे. आतापर्यंत अफवा पसरवणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्या १२२ जणांना आम्ही नोटीस पाठवल्यात. तर ६० खोट्या आणि चुकीच्या पोस्ट आम्ही डिलीट केल्या असल्याची माहिती  मुंबई पोलिसांनी दिली आहे.

true story behind online selling of plasma on internet read full story 

loading image
go to top