esakal | मोठी बातमी! मुंबईची लाइफलाईन टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी! मुंबईची लाइफलाईन टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू होणार?

आता मुंबईची लाईफलाइन असलेली रेल्वेची उपनगरी लोकल सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाल्याचं समजत आहे. 

मोठी बातमी! मुंबईची लाइफलाईन टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. मुंबईतला कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक सेवा ही ठप्प आहे. त्यातच मुंबईची लाइफलाईन लोकल सेवाही बंद आहे. मुंबईतल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी लोकल सेवा हा एकच पर्याय आहे. त्यामुळे आता मुंबईतील लोकल सेवा पुन्हा सुरु करण्याचा विचार करण्यात येत आहे. एकीकडे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मजूरांना आपल्या गावी घेऊन जाणाऱ्या श्रमिक ट्रेनची सुविधा भारतीय रेल्वेनं केली. मात्र मुंबई, ठाणे, पुण्यासह नाशिक भागांतील स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांच्या संख्येनुसार श्रमिक रेल्वे गाड्यांची उपलब्धता होत नसल्याचं चित्र समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता मुंबईची लाईफलाइन असलेली रेल्वेची उपनगरी लोकल सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाल्याचं समजत आहे. 

शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकल आणि त्यासोबतच श्रमिक रेल्वेच्या आणखी सेवा देण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी विनंती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु आहे. 

31 मे पर्यंतच्या लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचं वाढत संकट, त्यासाठीच्या उपाययोजना यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात शनिवारी बैठक झाली. या बैठकीसजलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे मुंबईतील व्यवहार ठप्प झालेत. येत्या काळात मुंबईतील व्यवहार बंद ठेवणं परवडणार नाही. म्हणूनच सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी आणि नंतर टप्याटप्प्यानं मुंबईकरांसाठी उपनगरी लोकल सेवा उपलब्ध करुन द्यावी लागेल, अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली. 

विद्यार्थ्यांचं करिअर बद्दलचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ लॉन्च...

या बैठकीत राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला गेला. तसंच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनावर काय उपाययोजना केल्या यावर चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पाळणारच, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महाविकास आघाडी सरकारनं दिलेला शब्दाला सरकार बांधिल असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. 

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणारं लोकलचं वेळापत्रक बदललं 

मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावत आहेत. मात्र या लोकलमध्ये गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याची माहिती मिळाली आहे. लोकल संख्या कमी आणि रेल्वे कर्मचारी जास्त असल्याने अनेक जण गर्दीत कसेबसे उभे राहून प्रवास करताहेत. म्हणूनच मध्य रेल्वे प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार लोकलचं नियोजन करण्याचं ठरवलं आहे. दरम्यान मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावर 14 विशेष लोकल धावणार आहेत. या लोकल फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असून विरार ते चर्चगेट या स्टेशन दरम्यान धावतील.

loading image
go to top