मुंबई

मुंबईतून शिवसेनेचे ‘किचन कॅबिनेट! वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाकरे सरकारमध्ये मुंबईतून शिवसेनेने ‘किचन कॅबिनेट’लाच पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, त्यातील  आदित्य ठाकरे वगळता इतर दोन मंत्री विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. 

राज्याच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी (ता. ३०) विस्तार झाला. त्यात वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे विधानपरिषद सभापती ॲड. अनिल परब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुंबईतून विधानपरिषद सदस्य सुभाष देसाई यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. ॲड. परब आणि देसाई ‘मातोश्री’च्या किचन कॅबिनेटमधील सदस्य आहेत.
सुभाष देसाई यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांपासून आमदारही नाराज होते. मात्र, तरीही त्यांना मंत्रिपद मिळाले होते. यंदा विधानसभेवरील आमदारांनाच मंत्रिपद देण्याची मागणी होती. तरीही देसाई आणि परब यांना मंत्रिपद मिळाल्याने चर्चा होत आहे.

काँग्रेसच्या मुंबईतील चार आमदारांपैकी तीन आमदार मुस्लिम; तर एक मराठी दलित आहे. त्यामुळे मंत्रिपद देताना काँग्रेसने एकाच दगडात तीन पक्षी मारले आहेत. धारावीच्या वर्षा गायकवाड या शहरी भागातील; तर अस्लम शेख मालाड उपनगरातील आहेत. त्यामुळे हा प्रादेशिक समतोल राखताना मराठी आणि हिंदीभाषक असा समतोल राखण्यात आला. त्यामुळे दलित मतदार पुन्हा मिळविण्यात हे सूत्र फायदेशीर ठरेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील एकमेव आमदार नवाब मलिक यांना मंत्रिपद दिले आहे.

आदित्य यांच्यावर शहरांची जबाबदारी
फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे केवळ मुंबईतील चेहरेच मंत्रिमंडळात होते. मात्र, या वेळी उद्धव यांनी ग्रामीण भागातील आमदारांना संधी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना ग्रामीण महाराष्ट्रात पाळेमुळे अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करणार, हे निश्‍चित आहे. हे करताना शहरी पकड सैल होऊ नये, याकरिता आदित्य ठाकरे यांच्यावर शहरांची जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठीच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT