मंत्रालयातील केबिन नंबर 602, एक शापित दालन ?

मंत्रालयातील केबिन नंबर 602, एक शापित दालन ?

महाराष्ट्रातील सत्तेचं पावर सेंटर म्हणवल्या जाणाऱ्या मंत्रालयात सर्व मंत्र्यांची कार्यालये आहेत. मात्र मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अशी एक केबिन आहे, जे अद्याप  कुणालाही अलॉट करण्यात आलेलं नाही. 

  • महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आलाय 
  • सर्व मंत्र्यांना आता खातेवाटप करण्यात येणार आहे, अशात मंत्रालयात सर्व मंत्र्यांना केबिन्स देण्याचं काम सुरु आहे
  • मात्र मंत्रालयात असं एक केबिन आहे जिथे कुणालाच बसायचं नाही 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन केल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. आता शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना पुढील दोन दिवसात खाती वाटप करण्यात येणार आहे. अशातच आता सर्व मंत्र्यांना मंत्रालयात केबिन्स  अलॉट करण्याचं काम सुरु आहे. मात्र, मंत्रालयात असं एक केबिन आहे जिथं कुणालाच बसायचं नाहीये. असं म्हणतात 'त्या' केबिनमध्ये जो मंत्री बसतो तो कधीच आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही. 

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 नंबरचं केबिन कुणालाही अलॉट केलेलं नाही. साधारण 3000 चौरस फुटांचं के ऑफिस आहे. यामध्ये एक कॉन्फरन्स रूम, ऑफिस स्टाफ हॉल आणि दोन मोठ्या केबिन्स आहेत. या आधी याच ऑफिसमधून महाराष्ट्राची सूत्र हलवली जायची. याच ऑफिसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सर्व वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव देखील बसायचे. मात्र या ऑफिसमध्ये आता कुणीच बसायला तयार नाही. असं बोललं जातं की या ऑफिसमध्ये जो बसतो त्याला कधीच आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. या अंधश्रद्धेमुळे इथं कुणीही बसायला तयार नाही.  

कुणाचा राजीनामा तर कुणाचा मृत्यू 

२०१४ रोजी भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर हे कार्यालय भाजपचे मोठे नेते आणि तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आलं. एकनाथ खडसे याच कार्यालयातून कृषी, महसूल आणि अल्पसंख्याक कल्याण विभाग सांभाळायचे. मात्र आपल्या कार्यकाळाच्या दोनच वर्षात  खडसे एका घोटाळ्यात अडकले ज्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. या नंतर काही काळ हे केबिन रिकामं राहिलं. त्यानंतर हे केबिन नवीन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आलं. मात्र 2018 मध्ये पांडुरंग फुंडकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.     

अनिल बोंडे यांचा निवडणुकीत पराजय  

२०१९ मध्ये कृषी विभागाची जबाबदारी भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांना देखील हेच केबिन देण्यात आलं. या नंतर अनिल बोंडे हे निवडणुकीत पराभूत झालेत आणि अफवांनी पेव फुटला. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील कोणत्याच मंत्र्याला मंत्रालयातील हे केबिन अद्याप देण्यात आलेलं नाही  

अजित पवार यांनी देखील नाकारली केबिन 

अजित पवार देखील याच कार्यलयात बसून काम करत असे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेत आणि त्यानंतर त्यांचं सरकार देखील गेलं. त्यामुळे अजित पवार यांनी हे केबिन घेण्यास नकार दिलाय. एकूण 43 मंत्र्यांना केबिन दिले जाणार आहेत. अशात मंत्र्याच्या पसंतीनुसार या केबिन्सचं वाटप करण्यात येणार आहे.  

WebTitle : no one wants cabin number 602 in mantralaya check inside story behind this

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com