shrikant shinde  sakal
मुंबई

Shrikant Shinde: जस बॉस वागतो तस कार्यकर्त्यांना करावं लागतं;शिंदेंचा दरेकरांना टोला

Kalyan Loksabha | श्रीकांत शिंदे यांचा वैशाली दरेकर यांच्या आडून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर वार

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan News| महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी विरोधी पक्षातील संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांची मिमिक्री करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

याला खासदार श्रीकांत यांनी उत्तर देताना दरेकर यांच्या आडून थेट ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नेते संजय राऊत यांच्यावर शाब्दिक वार केले आहेत. मी त्यांची चुकी मानत नाही. जस बॉस वागतो तस बिचारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना करावं लागत. निवडणूक झाल्यावर त्यांच्याकडे तेच काम उरेल असे शिंदे यांनी म्हटले आहे. (Shrikant Shinde)

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या अंबरनाथ येथे प्रचारासाठी गेल्या असता त्यांनी महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ज्यांना अ ब क येत नव्हतं त्यांना ते शिवसेनेने शिकवले.

अ ब क काय म्हणजे काय? आपण जे काम करतोय, आपल्या कडील सध्याची परिस्थिती किंवा समाजामध्ये जे काय चाललंय याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लियर असतात, तो कधी "या ठिकाणी, त्या ठिकाणी" "मग असं करत नाही". असे नक्कल करुन दाखविले.

पुढे त्या म्हणाल्या, कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदूमध्ये ते तयार असत. की आज मी अंबरनाथ मध्ये आले, अंबरनाथ मध्ये लोकांचे प्रश्न काय आहेत ? मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथे विचारलं ना की अंबरनाथ मधील प्रश्न काय? तर तो तुम्हाला झटपट सांगेल. कारण तो रोज अंबरनाथ मध्ये रस्तो रस्ते फिरतोय. तो अनुभवतोय. जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विषय क्लियर असतात. असं म्हणत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत मिमिक्री केली आह.

याला उत्तर देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी

दरेकर यांच्याविषयी बोलताना, मी त्यांची चुकी मानत नाही. त्या या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण जसं बॉस वागतो, जसं बॉस शिकवतो, तसं बिचारे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कराव लागत. आता त्यांना तेच कामधंदे उरणार आगेत. त्यांनी मिमिक्री करण्याचा प्रत्येक सभेमध्ये सुरू केलेल आहे. मला वाटतं ही निवडणूक झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे आहे ते उरणार आहे असे सांगत ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT