मुंबई

VIDEO : मुंबईचे रक्षक, मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी हाय-टेक सॅनिटायझेशन व्हॅन

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात करोना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर बंदोबस्तला तैनात आहेत. सामान्य माणसाप्रमाणे त्यांना देखील करोनाचा धोका आहेच.  या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर सॅनिटायझेशन व्हॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे.

आज गुरूवारी ९ एप्रिल रोजी या व्हँनची पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी पाहणी केली. मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतोय. अशात स्थानिक पोलिस देखील स्वत:चा जिव धोक्यात घालून ड्युटी करत असल्यामुळे त्यांना या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी  व्हॅनची पाहणी केली. 

करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. या दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 24 तास कामावर आहेत. त्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जावी या उद्देशाने या व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात तैनात असणार्‍या कर्मचाऱ्यांसाठी ही मोबाईल मिस्टींग सॅनिटायझर व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

या वाहनात एखादा कर्मचारी साधारण 10 सेकंद थांबल्यास निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे. या सर्वाचा परिणाम काही तास राहणार आहे. मुंबईतल्या ज्या महत्वाच्या परिमंडळात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्या 5 परिमंडळांना पहिल्या टप्यात सॅनिटायझर व्हँन दिल्या जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित परिमंडळांना गरजेनुसार ही व्हँन पुरवली जाणार आहे. मुंबईत सध्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

special high tech sanitizer vans for mumbai police to fight against corona


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT