मुंबई

केवळ राजकीय दबावापोटी मेल एक्सप्रेसच्या विशेष सेवा

रविंद्र खरात

कल्याण - केवळ राजकीय दबावापोटी रेल्वे प्रशासन मेल एक्सप्रेसच्या विशेष सेवा चालवितात. तर ठराविक वर्गाला खुष करण्याकरीता या कोलमडलेल्या मार्गिकेवर सीएसएमटी दिल्ली अशी राजधानी सहित अनेक एक्सप्रेस चालविल्या जात आहेत. कल्याण पुढील कर्जत आणि कसारा रेल्वे मार्गावरील कामावर प्रतिदिन लेटमार्कचा शिक्का बसत असून, आगामी काळात रेल्वे प्रवाश्यांच्या समस्या मांडून त्याची पूर्तता करेल. असे उमेदवारांनी आश्वासन दिले होते. असे न झाल्यास प्रवाश्यानी आपला राग व्यक्त करावा. यासाठी जन जागृती करणार असल्याचा इशारा कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत मार्गावरून 10 लाखाहून अधिक प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. मात्र अनेक वर्षापासून लोकल फेऱ्या न वाढविल्याने त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहे. यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध रेल्वे प्रकल्पांचे भुमिपुजन सुरू आहे. नवीन घोषणा होत आहेत. मार्केटिंग तंत्र अवलंबविणेबाबत काही गैर नाही मात्र ज्या योजनांच्या घोषणा केल्या त्याचे काय असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.

दरम्यान रेल्वे प्रशासनाने 2008साली कल्याण कसारा तिसरी मार्गिकेची प्रत्यक्षात घोषणा झाली. आराखडा तयार केला गेला. कल्याण पल्ल्याड शहाड ते कसारा दरम्यानच्या प्रवाशांचा वनवास संपणार हे चिञ तयार केले गेलेय माञ प्रत्यक्षात 10 वर्षात 25 टक्के कामही पुढे सरकलेले नाही. यात ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका, कल्याण यार्ड विकास, कल्याण कसारा तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण बदलापुर पर्यंत का होईना तिसरी चौथी मार्गिका, बदलापुर, अंबरनाथ, टिटवाळा, आसनगाव येथे होमफलाट, अश्या घोषणांचे काय ? असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केला असून, कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गाजवळ रेल्वे समांतर रस्ता नसल्याने जेव्हा केव्हा रेल्वे सेवा विस्कळीत होते तेव्हा रेल्वे प्रवाश्याचे हाल होतात. राज्य आणि केंद्र सरकार ही बदलून रेल्वे प्रवाश्यांच्या समस्या काही बदलेल्या नसून आर्थिक महसूल वाढविण्याच्या नादात मेल आणि मालगाडी पुढे काढत लोकल बाजूला करत असल्याने प्रवाश्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. 

रोजच्या उशिरा धावणा-या लोकल सेवेमुळे त्रस्त झालेला प्रवासी हा रेल्वे प्रशासन वा मग रेल्वे प्रवासी संघटना यांच्या नावाने बोटं मोडतायेत पण या दोघांच्याही मर्यादा लक्षात घ्यायला हव्या व आता 5 वर्षांनी पुन्हा मतदानाची नामी संधी आलेय त्यात आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी निवडताना मग तो आमदार असेल वा खासदार असेल त्याला किमान सामान्य जणांच्या प्रवासाची व रेल्वे प्रवासात उद्भविणा-या समस्यांची जाण असेल असा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. आपण सर्वच जण जशी भाजी पारखून घेतो तसाच आपला स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोक प्रतिनिधी नगरसेवक ते केंद्रातील लोकप्रतिनिधी खासदार निवडून देताना पारखण्याची गरज आहे. केवळ भावनेच्या मुद्द्यांवर आपण एक दिवस मतदानाच्या दिवशी सगळ्या यातना विसरणार असू तर मग आपल्याला येणारी आपली भावी पिढीही माफ करणार नाही. यामुळे रेल्वे प्रवाश्यांची समस्या ऐकेल त्याला मतदान नाहीतर नोटा वापर करू यासाठी जनजागृती करू असा इशारा कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT