ST News
ST News esakal
मुंबई

ST News: ३८०० एसटीचे स्पिडो मीटर बंद; मात्र चालकांना भरावा लागतोय भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा

नितीन बिनेकर

महाराष्ट्र्राच्या खेड्यापाड्यातून धावणारी लालपरी वेगाची मर्यादा ओलांडत गावा गावातून सुसाट पळत आहे. सुमारे ३ हजार ८०० गाड्यांचे स्पिडो मीटर बंद असल्याची माहिती उघडकीस आली असून चालकांना बस गाडयांची गतीच कळत नाही.

परिणामी अपघाताची शक्यता पहाता वाहतूक पोलिसांनी एसटी वेगात दामटवणाऱ्या चालकांवर कारवाई केली आहे. याचा फटका राज्यातील एसटी चालकांना बसणार असून दंडाची रक्कम चालकांच्या खिशातून एसटी महामंडळ कापणार आहे.

एसटीच्या चालकांकडून चुकीच्या पद्धतीने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवले जाते. त्यामुळे एसटी चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी, संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येत आहे.

अनेक एसटी चालकांना ५०० ते २५०० रुपयांपर्यत दंड आकारला जात आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगचे आहे. मात्र, सध्या राज्यभर ३ हजार ८०० एसटी बसेसचे स्पीडो मीटर बंद असल्याने वाहनांची गती एसटी चालकांना कळत नाहीत. त्यामुळे ओव्हरस्पिड ड्रायव्हिंग प्रकरणात वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून एसटी बसेसवर कारवाई करण्यात येत आहे.

आमचा काय दोष ?

राज्यभरात एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण १६ हजार बस गाड्या आहे. दररोज १४ हजार बस गाड्या रस्तावर धावत आहे. एसटी बस गाड्या ओव्हर स्पीड धावणार नाही, याकरिता एसटी महामंडळाच्या सर्व बस गाडयांना ताशी ८० किमी वेगावर स्पीड लिमिट लॉक करण्यात आली आहे.

मात्र, उतारावर एसटी गाड्या आटोमॅटिक ८० वर स्पीड पार करत आहे. त्यामुळे वेगमर्यादा उल्लंघन प्रकरणी एसटी बसेसवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी चालकांचा दोष नसताना सुद्धा वसुली करून एसटी चालकांनावर अन्याय केला जात असल्याचे मत एसटी चालकांनी सकळाशी बोलता व्यक्त केले .

- लेन कटिंगला प्रवासी जबाबदार

महामार्गावर अवजड वाहनांची मोठी संख्या असते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीतून सुटका मिळविण्यासाठी आणि प्रवाशांना वेळेत निश्चित स्थळी पोहचविण्यासाठी बस चालक लेन कटिंग करून गाड्या पुढे घेऊन जातात. तसे केले नाही, तर प्रवासी आरडाओरड करता.

त्यामुळे एसटी चालक लेन कटिंग करून बस गाड्या पुढे घेऊन जातात. त्यांच्याही दंड एसटी बस चालकांचा पगारातून एसटी महामंडळ कपात करत आहे. त्यामुळे ३२ हजार बस चालक तणावात आले असून त्याचे मोठे नुकसान होत आहे.

बहुतांश बस गाड्यांचे स्पिडो मीटर बंद आहे. त्यात बस गाडयांना स्पीड लॉक असताना उतारावर गाड्या वेगमर्यादा ऑटोमेटिक ओलांडतात अशा परिस्थितीत एसटी चालकांचा अडचणी न समजून घेता. आरटीओकडून आकारण्यात आलेला दंडाची रक्कम कामगारांच्या पगारातून कापणे म्हणजे हुकूमशाही आहे. प्रत्येक वेळी ई-चलान दिल्याने पगारातून दंडवसुली झाली तर अगोदरच वेतन कमी असलेल्या कामगारांनी खायचे काय ?

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेस

आम्ही आतापर्यत एसटी बसेस चालकांकडून चुक्कीचा पद्धतीने दंडाची रक्कम वसूल केलेला नाहीत. यासंदर्भातील माहिती घेत आहोत

- शिवाजी जगताप -महाव्यवस्थापक (वाहतूक )

या संदर्भातील माहिती चुकीची असून एसटी बसेसचे स्पीडो मीटर बंद नाहीत.

नंदकुमार कोलारकर, महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT