मुंबई

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम लवकरच सुरू 

सकाळवृत्तसेवा

भाईंदर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे सांस्कृतिक भवन आणि कलादालन उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत होती. त्यानुसार या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून, मिरा-भाईंदर महापालिका पुढील महिन्यात निविदा काढणार आहे. 

मिरा-भाईंदर शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभे रहावे, यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकार आणि महापालिकेकडे पाठपुरावा चालवला होता. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 6 जूनला महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांना आदेश पाठवला आहे. त्यानुसार महापालिकेच्या मंजूर विकास योजनेत भाईंदर पूर्व येथील आरक्षण क्रमांक 122 खेळाचे मैदान आणि सामाजिक वनीकरणासाठी राखीव आहे. 

हे आरक्षित क्षेत्र 46 हजार 700 चौरस मीटर असून, त्यापैकी 30,533.60 चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. याच जागेतील 4580.04 चौरस मीटर जागेवर तळमजला अधिक पहिला मजला असे स्मारक उभारावे, असे त्या आदशात म्हटले आहे. या कलादालनात शिवसेनाप्रमुखांची भाषणे, त्यांची छायाचित्रे, त्यांनी काढलेली व्यंगचित्रे मांडली जाणार असून त्याद्वारे त्यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार आहे. 10 ऑगस्टपर्यंत महापालिकेच्या नगरविकास विभागाकडून स्मारकाच्या आराखड्याला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर लगेच निविदा प्रक्रिया सुरू करून काम सुरू केले जाईल, असे महापालिका आयुक्त खतगावकर यांनी आमदार सरनाईक यांना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT