बालगृहातील मुलांशी संवाद साधताना स्टीव वाॅ 
मुंबई

बालगृहातील मुलांना स्टीव वॉ शिकवतोय क्रिकेट! 

रशिद इनामदार

मुंबई : आपल्या चिवट फलंदाजीने जगभरातल्या गोलंदाजांना नामोहरम करणारा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार स्टीव वॉ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहे. सोमवारी त्याने मानखुर्दमधील बालगृहाला भेट देत तिथल्या मुलांशी संवाद साधला. त्यांना क्रिकेटचेही धडे दिले. एवढा मोठा फलंदाज जवळून पाहता आला म्हणून प्रत्येक मुलाचा चेहरा खुलला होता. 

हे वाचलं का : सोशल मीडियावर सुरू झालंय `न्यू फ्लेक्स चॅलेंज`, बघा जमतंय का...

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या चेंबूर चिल्ड्रन्स होमला स्टीव वॉने भेट दिली. बालगृहातील मुलांमध्ये क्रिकेट खेळण्याची चांगली प्रतिभा आहे. त्यांचा खेळ पाहून आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून खूप आनंद झाला, असे मत स्टीवने व्यक्त केले. मला आव्हान स्वीकारायला आवडते. त्यातच खरी मजा असते. तुम्हीही आव्हान स्वीकारत आयुष्याची वाटचाल सुरू ठेवा, असा सल्ला त्याने मुलांना दिला. स्टीवकडून अनेक मुलांनी क्रिकेटचे बारकावे शिकून घेतले.

हेही वाचा : ठाकरे सरकार न्याय मिळवून देणार का?
 
स्टीव वॉची बालगृहाला भेट आणि त्याच्याकडून मिळालेले क्रिकेटचे धडे मुलांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे, अशा शब्दांत चिल्ड्रन्स एड सोसायटीचे मुख्याधिकारी विजय क्षीरसागर व नियामक परिषदेचे सदस्य नीलेश पवार यांनी आनंद व्यक्त केला. स्टीवने आपली स्वाक्षरी असलेल्या छोट्या बॅट व स्वतःची छायाचित्रे मुलांना भेट म्हणून दिली. या वेळी बालगृहातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हे वाचलं का : माेबाईल ठेवून मुले पळाली रस्त्यांवर...

लेझीमच्या तालावर स्वागत 
विशेष म्हणजे बालगृहात स्टीव वॉचे आगमन होताच मराठमोळ्या पद्धतीने औंक्षण करून त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर लेझीमच्या ठेक्‍यावर त्याला मैदानापर्यंत नेण्यात आले. अनोख्या स्वागतामुळे स्टीव वॉ आणि त्याचे सहकारी भारावून गेले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT