ठाकरे सरकार न्याय मिळवून देणार का ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

मुंबई - सिटी को.ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना न्याय मिळवून देणार का ? असे प्रश्न विचारणारे होर्डिंग्स मुंबईमध्ये लावण्यात आले आहेत. तसंच या होर्डिंगवर आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आणि समीर चव्हाण यांच्यावर कारवाई करून सिटी बँकेतील खातेधारकांना न्याय मिळवून देणार का? असे प्रश्न देखील यामाध्यमातून विचारण्यात आले आहेत. मातोश्री, सेनाभवन त्याचसोबत मुंबई महानगरपालिका या ठिकाणी हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत.

मोठी बातमी - मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू

सिटी को. ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना न्याय मिळणार का? असे प्रश्न विचारणारे होर्डिंग्स मुंबईच्या विविध नाक्यांवर लावलेले पाहायला मिळतायत. १८ एप्रिल २०१८ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातलेत. हे निर्बंध आजपर्यंत कायम आहेत. सिटी को ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंधांमुळे ११ खातेधारकांनी आपला जीव गमावलाय. अशातच उद्धव ठाकरे यांचं सरकार सिटी को. ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना न्याय मिळवून देणार का ? असे प्रश्न आता विचारले जातायत. 

मोठी बातमी - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ त्याचसोबत समीर चव्हाण यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल देखील या होर्डिंगच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. PMC बँकेच्या कथित घोटाळ्यातील अनेकांना ताबडतोब अटक झाली, मात्र सिटी को. ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक करणार का? सिटीच्या संचालक मंडळाची ED मार्फत चौकशी करणार का ? असे प्रश्न मुंबईत लागलेल्या या होर्डिंगवरून विचारण्यात आलेत. 

WebTitle : hording in mumbai for asking justice to citi co operative account holders

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hording in mumbai for asking justice to citi co operative account holders