सोशल मीडियावर सुरु झालंय 'न्यू फ्लेक्स चॅलेंज', बघा जमतंय का..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

सोशल मीडियावर कधी काय हिट होईल, कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. चांगल्या, वाईट, मजेशीर, भंकस अशा सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पडत असतात. अशात गेल्या काही काळात आपण बॉटल कॅप चॅलेंज, किकी चॅलेंज, आईस बकेट चॅलेंज असे एक ना अनेक गोष्टी व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. यात आता आणखी एका चॅलेंजची भर पडलीये. काय आहे हे चॅलेंज? कुणी सुरु केलंय हे चॅलेंज पाहुयात. 

हे अनोखं चॅलेंज एक अमेरिकन जिम्नॅस्टने सुरु केलंय. एकदा पाहाल तर म्हणाल, अरे यात काय कठीण , चुटकीसरशी मी हे करून दाखवतो. यामध्ये तुम्हाला फक्त जमिनीवर उपडं झोपायचंय आपले हात पाठीवर न्यायचे आणि ही मुलगी जशी चटकन , हात न सोडता उठतेय, तसं तुम्हाला पण करायचंय... काहीच समजलं नाही ? एक काम करा हा व्हिडीयो करा. 

new flex challenge??? Tag a friend that you think can do thisFollow on Tik Tok @jax_kranitz for more videos!!

A post shared by jax (@jax.kranitz) on

आता हे काहीतरी नवीन म्हटल्यावर नेटकऱ्यांचा या 'न्यू फ्लेक्स चॅलेंज'ला तुफान प्रतिसाद मिळतोय. जॅक्स जसं करतेय, तसं तुम्हाला जमतंय का बघा.. तिने सर्वांनाच हे चॅलेंज घेण्याचं आवाहन देखील केलंय. त्यामुळे तुमच्या मित्रांना टॅग करा आणि त्यांचे  मजेशीर व्हिडीओ शेअर करा.  

new challenge trending on social media see if you can do it or not

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new flex challenge trending on social media see if you can do it or not