मुंबई

कोरोना संकटातही पशु-पक्ष्यांना मिळाला आधार; खाद्यपुरवण्यापासून ते औषधोपचार करण्यापर्यंत केले कार्य

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना काळात अनेकांचे प्रचंड हाल झाले. रोजगार नसल्याने तसेच सर्व काही बंद झाल्याने समाजसेवी संस्थांकडून गरजू लोकांची मदत करण्यात येत होती. माणसांचीच ही परिस्थिती होती तर मुक्या पशु-पक्ष्यांनाची अवस्था फार बिकट झाली होती. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राणी मित्रांकडे दाखल झाल्या. यावर तोडगा म्हणून प्राणीमित्रांनी पुढाकार घेऊन भटक्यांसह पाळीव पशुपक्षी तसेच प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला.

कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळातही प्राणी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी 'पॉज मुंबई' आणि 'अम्मा केअर फाऊंडेशन' (एसीएफ) सतत कार्यरत आहे. आता त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकत एसीएफतर्फे प्राण्यांना मदत करण्यासाठी ‘फेडरेशन ऑफ इंडियन एनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन’(एफआयएपीओ) आणि 'प्लांट एण्ड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी' (पॉज-मुंबई) यांच्या सहकार्याने ‘एसीएफ हेल्पिंग हँड फॉर द व्हॉईसलेस’हा उपक्रम सुरू केला आहे. 

कोरोना हा साथीचा आजार सर्व देशभर पसरला असताना संस्थेतर्फे पशु-पक्ष्यांसाठी अनेक कार्य करण्याच येत आहेत. पुढील काळातही भटक्या आणि मुक्त प्राण्यांना खाद्य पुरविणे, जनावरांसाठी प्रथमोपचार किट पुरविणे, लसीकरण आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन भांडूप येथे नुकतेच करण्यात आले. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एसीएफ आणि पॉज-मुंबई प्राण्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्य करत आहे. अन्न पुरठ्यापासून मुंबई महापालिका, पोलिस आणि वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने हे प्राणी रक्षण आणि बचावाचे कार्य सुरु होते. 

आतापर्यंत मुंबई आणि परिसरातील 150 हून अधिक श्वान तसेच मांजरीच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एखादी पक्षी किंवा प्राणी जखमी झाल्या बाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिवसाला 3 ते 4 फोन येतात. त्यासाठी प्रथमोपचार किट आणि एँब्युलन्सची व्यवस्था ही करण्यात आली आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या बंद घरांमधून जनावरांची सुटका करण्यात आली आहे. त्यांचे मालक बरे होवून घरी येईपर्यंत त्या प्राण्यांची काळजी घेणे, सेलिब्रिटी आणि पशुवैद्यकांच्या मदतीने जनजागृती करणे, पाळीव जनावरांना दत्तक देण्यास मदत करणे, शिवाय वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या मदतीने पुनर्वसनास मदत करणे अशी अनेक कार्य संस्थेतर्फे करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर गरजू स्वयंसेवकांना मासिक घरगुती मदत सुद्धा केली जात असल्याचे  पॉज संस्थेचे मुंबई सचिव तथा मानद जिल्हा पशु कल्याण अधिकारी सुनिष सुब्रमण्यन यांनी सांगितले.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT