High-Court-Mumbai
High-Court-Mumbai 
मुंबई

संशोधनात्मक नोंदीही उपलब्ध करा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आधार ठरलेल्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील संशोधनात्मक नोंदीही उपलब्ध कराव्यात, अशी मागणी याचिकादारांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. 

मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबत सुमारे तीन हजार पानांचा अहवाल सरकारला सादर केला आहे. त्यापैकी मुख्य अहवाल (नोंदीशिवाय) याचिकादारांना देण्याचे निर्देश न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. सरकारनेही सीडीच्या स्वरूपात हा अहवाल याचिकादारांना उपलब्ध केला आहे; मात्र त्यातील अनेक संदर्भ नोंदीवर आधारित आहेत. या नोंदीचे वाचन होईपर्यंत अंतिम सुनावणीदरम्यान युक्तिवाद करता येणार नाही, असे ॲड. संजित शुक्‍ला यांच्या वतीने बुधवारी खंडपीठाला सांगण्यात आले.

नोंदी देण्याचे आदेश नाहीत
याचिकाकर्त्यांच्या या मागणीस सरकारच्या वतीने विरोध करण्यात आला. न्यायालयाने अहवाल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. नोंदींचे वाचन करायचे असल्यास तेवढ्यापुरत्या त्या उपलब्ध करण्याचे निर्देशही दिले आहेत; मात्र नोंदी देण्याचे आदेश नाहीत, असे सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सांगितले. नोंदी देण्याबाबत सरकारने गुरुवारी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT